सहसंपादक अनिल बोराडे
साक्री शहरातील शासकीय विश्रामगृह येथे क्रीडा शिक्षक महासंघाची तालुकास्तरीय कार्यकारिणी निवडण्यासाठी विशेष सभा उत्साहात पार पडली. या सभेत आगामी कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली असून, अध्यक्षपदाची धुरा खान्देश गांधी माध्यमिक व उच्च मा
ध्यमिक विद्यालय, कासारे येथील श्री. नितीन खैरणार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
निवडीची पार्श्वभूमी
क्रीडा शिक्षक महासंघाच्या मागील कार्यकारिणीतील अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेली पदे भरणे आणि संघटनेला नवीन उभारी देणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या सभेत सर्वानुमते नवीन टीमची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
* अध्यक्ष: श्री. नितीन खैरणार
* उपाध्यक्ष: राकेश मोरे, राज देवरे, अमोल अहिरे, विजय पाटील.
* सचिव: धनंजय घरटे
* सहसचिव: भूषण ठाकरे
* प्रसिध्दीप्रमुख: विनोद भदाणे, जयेश खैरणार
* महिला प्रतिनिधी: श्रीमती के.आर. अहिरे, श्रीमती प्रतिभा बेडसे
कार्यकारिणी सदस्य:
पंकज बोरसे, कुणाल देवरे, के.पी. देवरे, बिपिन देसले, प्रविण जाधव, भाउसाहेब पाटील, सुनील भामरे, विनायक देवरे, सुनिल सोनवणे, किशोर भामरे.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
ही समिती गठीत करण्याच्या प्रक्रियेत जिल्हा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय दहिते, जिल्हा सहसचिव उमेश देसले, जिल्हा सदस्य प्रसाद भाडणेकर आणि सुमित देसले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून निवडणूक प्रक्रिया पार पाडली. तसेच तालुका क्रीडा मार्गदर्शक धनंजय सोनवणे व अनिल पाटील यांनी नूतन कार्यकारिणीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अभिनंदनाचा वर्षाव
नूतन निवडीबद्दल राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, जिल्हाध्यक्ष आनंद पवार, सचिव डॉ. भूपेंद्र मालपुरे, तसेच तालुक्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक एस.एन. देवरे, विलास देसले, लालाजी नांद्रे, विकास देसले आणि संजय भामरे यांनी आनंद व्यक्त करत सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी ही नूतन कार्यकारिणी कटिबद्ध राहील, असा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष नितीन खैरणार यांनी यावेळी व्यक्त केला.



Post a Comment
0 Comments