Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सावित्रीबाई फुले केवळ शिक्षिका नव्हत्या तर क्रांतीची मशाल होत्या: प्राचार्य एस.डी. पाटील

 सहसंपादक अनिल बोराडे 

पिंपळनेर: ज्या काळात महिलांनी शिक्षण घेणे पाप मानले जात होते, त्याच कठीण काळात सावित्रीबाई फुले यांनी हातात पुस्तक घेतले आणि समाजाच्या इतिहासाची दिशा बदलली. त्यांनी केवळ अक्षरे शिकवली नाहीत, तर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून क्रांतीची मशाल पेटवली, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य एस.डी. पाटील यांनी केले.

पिंपळनेर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अनमोल कामगिरीला अभिवादन करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य पाटील बोलत होते.



कार्यक्रमाचे स्वरूप आणि मान्यवर

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळनेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व्ही.एन. जिरे पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. शिवप्रसाद शेवाळे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना श्रीमती एम.डी. माळी म्हणाल्या की, "सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणासाठीच नव्हे, तर समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्धही मोठा लढा दिला. महिलांचे केशवपन थांबवणे, सती प्रथा बंद करणे, विधवा विवाहास प्रोत्साहन देणे आणि जुनाट रूढी-परंपरा मोडीत काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता."

काव्य आणि विचारांतून आदरांजली

 * श्रीमती मनीषा भदाने यांनी आपल्या स्वरचित काव्यवाचनातून सावित्रीबाईंच्या संघर्षाला उजाळा देत आदरांजली वाहिली.

 * श्रीमती छाया वाडेकर यांनीही सावित्रीबाईंच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.

उपस्थित मान्यवर

या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप, प्राचार्य एस.डी. पाटील, डी.डी. महाले, प्रा. डॉ. योगेश नांद्रे, ललित मराठे, अनिल बोराडे, भिलाजी जिरे, दिलीप बोळे, देविदास पाटील यांसह परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप अंनिसचे जिल्हा कार्यवाह सुभाष जगताप यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला

Post a Comment

0 Comments