Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

📰 राज्यस्तरीय मातंग समाज वधू-वर परिचय मेळावा आणि परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळ्याचे यशस्वी आयोजन!

 सहसंपादक अनिल बोराडे 

बडनेरा / अमरावती: 

अनोखी संधी: वधू-वर निवडण्यासाठी पालकांना थेट भेटीची सोय उपलब्ध

अण्णाभाऊ साठे क्रांती परिषद आणि मुक्ता साळवे महिला शक्ती परिषद, तसेच मातंग वधू-वर सूचक केंद्र व विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम भवन, विश्राम गृहाजवळ, नवी वस्ती बडनेरा, जि. अमरावती येथे राज्यस्तरीय मातंग समाज वधू-वर परिचय मेळावा आणि युवक युवती परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.



प्रमुख वैशिष्ट्ये:

 * विस्तृत सहभाग: मेळाव्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, सह महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांतून वधू-वर नोंदणी करून उपस्थित राहणार आहेत.

 * नोदंणीचा उच्चांक: विविध क्षेत्रांतील (शिक्षित, सुशिक्षित, उच्चशिक्षित, सरकारी, निमसरकारी, कर्मचारी, व्यावसायिक, उद्योगी, गरीब, श्रीमंत, विधवा, घटस्फोटित) १००० पेक्षा अधिक मुला-मुलींच्या फोटोसह बायोडाटाचे स्थळ असलेले परिचय पुस्तिका मेळाव्यात प्रकाशित करण्यात आले.

 * पालकांसाठी सुवर्णसंधी: लग्नायोग्य मुला-मुलींना आपल्या प्रत्यक्ष जोडीदार निवडून घेता यावा आणि पालकांना मुला-मुली पाहण्याचा खर्च व त्रास टळावा, तसेच मुला-मुलींच्या योग्य स्थळाची माहिती व्हावी, या उदात्त उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याचे विशेष आकर्षण:

 * सर्व सोयीयुक्त कार्यक्रमाचे स्थळ

 * जेवणाची सोय

 * लांब वरून येणाऱ्यांसाठी सोय

 * पसंती नंतर चर्चासाठी सोय

 * गर्दी टाळण्यासाठी पासेसची सोय

 * सकाळपासूनच नोंदणीची सोय

मातंग समाजातील उपवर मुला-मुलींनी व पालकांनी या मेळाव्याचा व युवक युवती परिचय पुस्तिकेचा लाभ घेण्यासाठी ९९२३४९९५८५ या नंबरवर त्वरीत बायोडाटा पाठवून संपर्क करावा, असे आवाहन आयोजक ईश्वरदास गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments