Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत NDA मध्ये उंभरे येथील भूमिपुत्र विजय शेवाळे यांची निवड

सहसंपादक अनिल बोराडे 

 पिंपळनेर / उंभरे : साक्री तालुक्यातील 1800 लोकवस्तीच्या उंभरे गावासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी आहे. येथील भूमिपुत्र विजय शेवाळे याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून, त्याची निवड झाली आहे.



विजय शेवाळे याने संपूर्ण भारतातून (ऑल इंडिया रँक) 405 वा क्रमांक मिळवत NDA मध्ये स्थान निश्चित केले आहे. या निवड प्रक्रियेनंतर तो दोन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर लेफ्टनंट कर्नल पदासाठी पात्र ठरणार असून, त्याची तिन्ही सेनादलांच्या (भूदल, नौदल आणि वायुदल) कमांडिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

विजय हा पांझरा कान सहकारी साखर कारखान्याचे स्टोर अकाउंटंट पोपटराव शेवाळे यांचा नातू आणि नाशिक येथील पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांचा सुपुत्र आहे. त्याचे काका पोलीस निरीक्षक सचिन शेवाळे आणि पत्रकार प्रा. शिवप्रसाद शेवाळे आहेत.

उंभरे गाव देशसेवेसाठी तरुणांना सैन्यात पाठवण्यासाठी ओळखले जाते आणि या गावातून मोठ्या संख्येने तरुण सैन्य दलात कार्यरत आहेत. मात्र, विजय शेवाळे हा परिसरातील एकमेव असा युवक आहे, जो एवढ्या मोठ्या सेना दलाच्या अधिकारी पदावर विराजमान होणार आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे उंभरे, उंभर्टी, देगाव, दिघावे या पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विजय शेवाळे याने परिसरातील युवकांना उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा दिली आहे.

Post a Comment

0 Comments