सहसंपादक अनिल बोराडे
साक्री (वार्ताहार): आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यात शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) मोठे बळ मिळाले आहे. गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत, आमदार सौ. मंजुळाताई गावित आणि शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. श्री. तुळशिराम गावित यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या पक्षप्रवेशांमध्ये साक्री तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश होता, ज्यामुळे तालुक्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे.
मांजरीचे सरपंच अनिल पवार यांचा शिवसेनेत प्रवेश
या पक्षप्रवेश सोहळ्यात मांजरी येथील सुमारे १५ वर्षांपासून सरपंचपदी असलेले आणि विद्यमान सरपंच अनिल पवार यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मांजरी ग्रामपंचायतीवरील त्यांचा प्रभाव पाहता, हा प्रवेश शिवसेनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
अनेक गावांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश
साक्री येथे झालेल्या शिवसैनिकांच्या आढावा बैठकीत गरताड, रोहोड, भामेर, मांजरी, वाजदरे, मोहगाव, मापलगाव, बोधगाव, हारपाडा, कुत्तरमारे, चावडीपाडा, होळ्याचापाडा, तामसवाडी, विटावे, खोरी, मालपूर, तोरणकुडी, नवापाडा यांसह अनेक गावांतील सरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी मोहगावचे सरपंच लक्ष्मण महाले, तसेच पिंपळनेर, वासखेडी, जैताणे, जामदे, खुडाणे, उंभरीपान, गरताड, राईनपाडा, भाडणे, मंडाणे, बुरुडखे, आमळी या परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश केला.
साक्री येथील काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आणि भोरटेपाडा ग्रा.पं. सदस्य अमोल ठाकरे, तामसवाडी ग्रामपंचायत सदस्य बापु मालचे, बुरुडखेचे उपसरपंच गुलाब शेठ यांच्यासह शामराव सोनवणे, गणेश पवार, चुनिलाल बागुल, श्रीमती अनिता खंड्डु कुवर, डुक्कर झिरे, संगिता अविनाश बच्छाव (पिंपळनेर), शोभा कुवर, शितल मुजगे (वासखेडी), सुरेखा सुर्यवंशी, प्रमिला पवार, पुनम सोनवणे अशा अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला.
दादाजी भुसे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
यावेळी शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून आणण्याचे, पक्षाची ताकद वाढवण्याचे आणि सर्वत्र भगवा फडकवण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हिलाल आण्णा माळी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विशाल देसले, शिवसेना तालुका प्रमुख श्री. पंकज मराठे, जिल्हा प्रमुख सतिषतात्या महाले, मनोज मोरे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. संगिता पगारे व सौ. यामीनी दहिते, शिवसेना पदाधिकारी श्री. संभाजी अहिरराव, श्री. राजधर देसले, नगर सेवक राहुल भोसले, गोविंदा पहेलवान, मंगलदास सूर्यवंशी, तुषार भामरे, चंद्रकांत मस्के, मुकेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments