सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर- महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. पिंपळनेर येथील मनकर्णाबाई विनायकराव मराठे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश उत्तमराव पाटील यांची राज्यस्तरीय व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटकसंच विकसन कार्यशाळेकरिता राज्यस्तरीय विशेष तज्ज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातून या प्रतिष्ठित समितीवर निवड होणारे डॉ. पाटील आता व्यसनमुक्तीच्या गंभीर सामाजिक प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपला अनुभव देणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) यांनी आदेश जा.क्र./राशैसंप्रपम/सा.शा.वि/व्य.मु./२०२५/नुसार, दिनांक-२०/०९/२०२५च्या आदेशान्वये ही निवड केली आहे.
निवडीचे महत्त्व
सध्याच्या काळात व्यसन हा एक मोठा सामाजिक प्रश्न बनला आहे, ज्याचे प्रमाण विद्यार्थी आणि युवकांमध्ये झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या व्यसनामुळे आरोग्य, कुटुंब, समाज आणि पर्यायाने राष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात व्यसन आणि व्यसनांचे दुष्परिणाम यांचा समावेश करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
याच अनुषंगाने, विद्यार्थी व युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्ती वाचन साहित्य व घटकसंच विकसित करण्याचे काम SCERT, पुणे यांच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या निर्मितीसाठी पहिली कार्यशाळा SCERT, पुणे येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
मार्गदर्शक व अभिनंदनीय
या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे चे सन्माननीय संचालक मा. राहुलजी रेखावार (भाप्रसे), उपसंचालिका मा. डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक मा. अरुण जाधव (सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग), तसेच अधिव्याख्याता श्रीमती. शितल शिंदे आणि श्री. बाळासाहेब गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य डॉ. सतीश पाटील यांच्या या अभिनंदनीय निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
अभिनंदन करणारे मान्यवर
डॉ. पाटील यांचे अभिनंदन करणाऱ्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे, संचालक कुणाल गांगुर्डे, संचालक यजुर्वेद्र मराठे, संचालक जयेश मराठे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आणि प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. श्रीपालजी सबनीस यांचा समावेश आहे. त्यांच्या या महत्त्वाच्या योगदानामुळे राज्याच्या व्यसनमुक्ती मोहिमेला बळ मिळणार आहे.
Post a Comment
0 Comments