सहसंपादक अनिल बोराडे
शिंदखेडा:धुळे जिल्ह्याच्या खासदार, माननीय शोभाताई बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चौरे यांनी सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
खासदार शोभाताई बच्छाव यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना जास्तीत जास्त मदत शासनाकडून कशी मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या महत्त्वाच्या दौऱ्यात जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे हे अग्रभागी होते. त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणींची माहिती घेतली.
दुष्काळग्रस्त भागाला दिलासा देण्याचा प्रयत्न
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे यांनी दुष्काळाची दाहकता आणि शेतकऱ्यांच्या व्यथा खासदार महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे, शासकीय मदत तसेच पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त केली. दुष्काळग्रस्तांना त्वरित दिलासा मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने प्रयत्न करेल, अशी ग्वाही चौरे यांनी दिली.
उपस्थित मान्यवर
या दौऱ्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. दरबारसिंग गिरासे, कार्याध्यक्ष प्रमोद सिसोदे, डॉ. दिनेश बच्छाव, धुळे शहराध्यक्ष साबीर भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments