वडखुट: दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडखुट (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथे शैक्षणिक साहित्य वाटप, शैक्षणिक मार्गदर्शक व आरोग्य मार्गदर्शक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नारायण साधू चौरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
![]() |
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिंचपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय मनोज साळवे सर, गावातील लोकनियुक्त सरपंच सौ. अबि़ताताई मोहन वळवी, वनवासी विद्यालय, चिंचपाडाचे प्राचार्य श्री. प्रमोद चिंचोले सर, वडखुटचे माजी सरपंच श्री. मोहन दादा छगन गावित, माजी सरपंच श्रीमती मालतीबाई वसावे, माजी सरपंच मानसीबाई वसावे, माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते राजू दादा गावित, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विकेश दादा वसावे आणि गावातील विशेष सहकार्य करणारे श्री. अतुल वसावे, सुनील वसावे, साहिल वसावे, राहुल गावित तसेच समस्त पालक, ग्रामस्थ व युवक-युवती उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर चिंचपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय मनोज साळवे सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. त्यानंतर सर्व मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर मार्गदर्शन सत्राला सुरुवात झाली. श्री. चिंचोले सर, प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले. माजी सरपंच श्री. मोहन दादा गावित यांनी विद्यार्थी आणि पालकांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. सरपंच प्रतिनिधी वळवी सर यांनी विद्यार्थी व पालकांसाठी विविध प्रकारचे कृतीयुक्त ‘एबीसीडी’ (अध्ययन-अध्यापन साधने) व मार्गदर्शन सादर केले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. नारायण चौरे सर यांनी विद्यार्थी, पालक यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात माननीय श्री. मनोज साळवे साहेब यांनी विद्यार्थी, पालक आणि गावातील तरुण मंडळींना अमूल्य असे मार्गदर्शन करून शिबिराच्या आयोजनाबद्दल शाळेचे अभिनंदन केले.
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री. संजय सोनवणे सर यांनी केले, तर श्री. शिंदे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षणार्थी कुमारी नेहा वसावे मॅडम यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करून या मार्गदर्शन शिबिराची सांगता झाली.
Post a Comment
0 Comments