संपादकीय
नंदुरबार -- रामायणकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती नंदुरबार तालुक्यातील बह्याणे येथे आदिवासी कोळी जमातीच्या वतीने अतिशय उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावकऱ्यांनी महर्षी वाल्मिकींचे एक सुंदर मंदिर बांधून त्यात विधिवत पूजा-अर्चा करून महर्षी वाल्मिकींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.
दिनांक ११/१०/२०२५ रोजी गावातून ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या दिमाखात मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर मूर्तीची स्थापना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच दिनांक १२/१०/२०२५ रोजी आचार्य वेदमूर्ती अविनाश दादा जोशी नंदुरबारकर यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
या सोहळ्यानिमित्त नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून महाप्रसादाचा (भंडारा) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी आदिवासी कोळी जमातीचे सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि महर्षी वाल्मिकींच्या कार्याचा आणि संदेशाचा गौरव केला.
या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष भास्कर कुवर, वाल्मिकलव्य सेनेचे प्रदेश अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे, मित्तलगृपचे जगदिश बागल, नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पीएसआय सुनील भाबड साहेब, हेमंत सुर्यवंशी, इंदास चित्ते, गणेश बागुल, मनोहर वाघ, अर्जुन शिरसाट, भरत कोळी, किरण वाघ आदी मान्यवर तसेच महिला भगिनींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बह्याणे गावचे पोलिस पाटील किरण कोळी यांच्यासह मधुकर कोळी, बापु कोळी, योगेश कोळी, दिपक कोळी, शुभम कोळी, तुळशीराम कोळी, सुरेश कोळी, दत्तु कोळी, हरीश कोळी, प्रल्हाद कोळी, चेतन कोळी, राजेंद्र कोळी, मोहित कोळी, राजाराम कोळी, शिवाजी कोळी आणि महर्षी वाल्मिकी मंडळ, बह्याणे यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान गिरासे यांनी केले. महर्षी वाल्मिकींच्या मंदिर उभारणीमुळे आणि जयंती उत्सवामुळे बह्याणे गावात एक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
Post a Comment
0 Comments