Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

साक्री: जि.प. केंद्रशाळा देशशिरवाडे येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त

सहसंपादक अनिल बोराडे 

धुळे: साक्री तालुक्यातील जि.प. केंद्रशाळा, देशशिरवाडे येथे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'जागतिक हात धुवा दिन', 'वाचन प्रेरणा दिवस' आणि 'विद्यार्थी दिवस' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगिता रायते होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गावाच्या सरपंच सौ. वत्सलाताई सोनवणे, विशेष शिक्षक विद्या दीपक सूर्यवंशी व त्यांचे पती श्री दीपक सूर्यवंशी, शाळेतील शिक्षक श्री. अनिल काकुस्ते, श्री महेंद्र महाले, अंगणवाडी ताई तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

अध्यक्ष व शिक्षकांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कलाम यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली. शाळेचे शिक्षक श्री. अनिल काकुस्ते यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा सखोल परिचय करून दिला. श्री. महेंद्र महाले यांनी 'विद्यार्थी दिना'चे महत्त्व स्पष्ट केले. विशेष शिक्षक विद्या दीपक सूर्यवंशी यांनी 'स्वच्छ हात धुवा' मोहिमेचे महत्त्व विशद करत योग्य प्रकारे हात धुण्याचे मार्गदर्शन केले.

अध्यक्षा श्रीमती संगिता रायते यांनी आपल्या भाषणात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे कार्य, 'जागतिक हात धुवा दिन' आणि 'विद्यार्थी दिना'च्या उद्देशावर सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून 'जागतिक हात धुवा दिना'निमित्त सामुदायिक प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. यात शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी, स्वयंपाकीन, मदतनीस तसेच पालक वर्गाने सक्रिय सहभाग घेऊन हात धुण्याचे प्रात्यक्षिक केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल काकुस्ते यांनी केले, तर श्री. महेंद्र महाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments