सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर (धुळे): श्री स्वामी ग्रुप, पिंपळनेर यांच्यावतीने गुरुवार, दि. १६/१०/२०२५ रोजी रात्री ८ वाजता प्रसिद्ध व्याख्याते प्रा. श्री. वसंतजी हंकारे यांच्या 'जीवंतपणीच आई व बापाला मृत्यूचे दार भरकटलेली तरुणाई' या विषयावरील भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आई-वडिलांचे महत्व, आजच्या तरुणाईची मानसिकता आणि आई-वडील व पाल्यामधील तुटत जाणारे नातेसंबंध यावर प्रा. हंकारे आपल्या ओजस्वी वाणीतून विचार मांडणार आहेत.
प्रा. वसंत हंकारे हे त्यांच्या प्रभावी, भावनिक आणि अंतर्मुख करणाऱ्या व्याख्यानांसाठी महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांचे 'आई-बाप' या विषयावरील व्याख्यान विशेष गाजलेले आहे, ज्यात ते मुलांचे आणि पालकांचे नाते अत्यंत संवेदनशीलपणे लोकांसमोर उभे करतात.
कार्यक्रमाची रूपरेषा
'जि. प. कन्या शाळा, सटाणा रोड, पिंपळनेर (धुळे)' येथे हे व्याख्यान होणार आहे.
प्रमुख पाहुणे आणि मान्यवर:
* अध्यक्ष म्हणून मा. श्री. चैत्राम पवार (धर्मरत्न पुरस्कार प्राप्त, बारीपाडा) उपस्थित राहतील.
* प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. जितेंद्र नरेश भावे (रोखठोक सामाजिक कार्यकर्ते, नाशिक), मा. श्री. महंत सर्वेश्वरदास खाकी (राममंदिरे महाराज, पिंपळनेर), मा. श्री. किरण वग (सहायक पो. नि. पिंपळनेर पो. स्टेशन), मा. श्री. विंदुशेठ शर्मा (शेतकरी मित्र, सटाणा), मा. श्री. मोहम्मद शब्बीरभाई पिंपळनेरवाला (सामाजिक कार्यकर्ते, पिंपळनेर) आणि मा. श्री. दीपक पाटील (प्रभारी मुख्याधिकारी, नागरदेवळे पिंपळनेर) यांची उपस्थिती राहणार आहे.
विशेष सहकार्य:
सिनियर कॉलेज, कि. सा. ना. पा. पाटील, इंदिरा कन्या, इंदिरा डॉक्टरसिंह ज्ञानोपीठासह पिंपळनेर येथील विविध शाळा, महाविद्यालये, संघटना आणि असंख्य महिला बचत गट या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करत आहेत.
आयोजकांचे आवाहन
श्री स्वामी ग्रुप, पिंपळनेर यांनी पिंपळनेर नगरीतील सर्व नागरिक, तरुण-तरुणी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. प्रशांत पांडुरंग जगताप, श्री. दत्तात्रय यशवंत पवार, श्री. सुनील रामदास भामरे, श्री. किशोर तुकाराम चौधरी, श्री. भूषण सुनिल शाह आणि श्री. सुनिल भद्रु चौधरी प्रयत्नशील आहेत.
टीप: हे व्याख्यान रात्री ८ ते १० वाजेपर्यंत चालणार आहे.
Post a Comment
0 Comments