सहसंपादक अनिल बोराडे
सामोडे: जयदया शिक्षण प्रसारक मंडळ सामोडे संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सामोडे येथे २६ सप्टेंबर २०२५ रोजी रेड रिबन क्लब आणि आयसीटीसी विभाग, ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने एचआयव्ही/एड्स जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जनजागृती कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथील आयसीटीसी विभागाचे समुपदेशक डॉ. हेमंत जाधव आणि सुशिला चव्हाण यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना एचआयव्ही (HIV) आणि एड्स (AIDS) बद्दल सविस्तर माहिती दिली, रोगाची कारणे, लक्षणे, आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय स्पष्ट केले. तसेच, उपचारांपेक्षा प्रतिबंधाचे महत्त्व अधिक असल्याचे सांगितले.
संस्थेचे प्राचार्य योगेश सोनवणे यांनी यावेळी बोलताना, "एड्सवर उपाय शोधण्यापेक्षा एड्स न होऊ देण्याची खबरदारी घेतलेली बरी" असे महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले. त्यांनी प्रशिक्षणार्थींना आरोग्यविषयक सवयी आणि सुरक्षित जीवनशैलीचे पालन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन प्रकाश शिंदे, संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंदे, सचिव शरद शिंदे, संजय शिंदे, हंसराज शिंदे, आय.टी.आय. चे प्रशासकीय अधिकारी भगवान देवरे, तसेच निदेशक गोकुळ मोरे, चंद्रकांत सोनवणे, सचिन सोनवणे, महारु चौरे, चेतन सूर्यवंशी, महेंद्र चौरे, संजय ससले आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व व्यवसायांचे प्रशिक्षणार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेड रिबन क्लबच्या सदस्यांनी आणि आयटीआय सामोडेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये एचआयव्ही/एड्स प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, तो एक यशस्वी उपक्रम ठरला आहे.
Post a Comment
0 Comments