सहसंपादक अनिल बोराडे
कुडाशी, (खिरणीपाडा): पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सुशासन पंधरवाडा (१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) अंतर्गत, आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी कुडाशी (खिरणीपाडा) येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आणि हनुमान मंदिर स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.
दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याला अभिवादन
या विशेष कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पिंपळनेर ग्रामीण मंडळाचे सरचिटणीस श्री धनंजय घरटे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. तसेच, भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक म्हणून त्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. याव्यतिरिक्त, केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली, ज्यामुळे त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्यास मदत होईल.
स्वच्छता अभियानात मान्यवरांची सक्रिय उपस्थिती
यावेळी हनुमान मंदिर स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले, ज्यामध्ये सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन मंदिराचा परिसर स्वच्छ केला.
या कार्यक्रमाला पिंपळनेर ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष इंजि. विकी दादा कोकणी, जि प प्रतिनिधी श्री साहेबराव गांगुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांमध्ये शशिकांत सोनवणे (डांग शिरवाडे), योगेश भामरे, महेंद्र जगताप, वसंत अहिरे (ग्रामीण उपाध्यक्ष), गुलाब चौरे (सरचिटणीस पिंपळनेर ग्रामीण मंडळ), डॉक्टर योगेश देवरे (वैद्यकीय आघाडी प्रमुख), मिथुन गायकवाड (प्रसिद्धी प्रमुख), प्रदीप गवळी (प्रज्ञावंत आघाडी अध्यक्ष), शिवाजी चौधरी (युवा अध्यक्ष), अनिल देसाई (चिटणीस पिंपळनेर ग्रामीण मंडळ), राजेंद्र महाले, तानाजी साबळे, छोटी राम राऊत, सागर चव्हाण, रमेश चौधरी, धनलाल ठाकरे (शेवडीपाडा सरपंच) तसेच अनिकेत अहिराव, केशव चौधरी, खुशाल दाभाडे, भाईदास सोनवणे, छोटी राम बागुल, ऋषिकेश सोनवणे, दिनेश चौधरी, जयदीप सोनवणे, विजय सोनवणे, योगेश सोनवणे, केशव चौधरी, अनुजी सोनवणे, डॉक्टर योगेश एखंडे, दिलीप बिरारीस, विनय सोनवणे, राजू गांगुर्डे, छोटू बागुल, पोपट भाऊ, सुकाराम भाऊ, मन्साराम पवार, काळू कामडे, श्रीराम चौधरी, आणि दिनेश चौधरी यांसारख्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार आत्मसात करून आणि स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सेवा व सुशासन यांचा संदेश देत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
Post a Comment
0 Comments