सहसंपादक अनिल बोराडे
मालेगाव, २३ सप्टेंबर २०२५: मालेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांनी तात्काळ पावले उचलली आहेत. त्यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
काल रात्री मालेगाव तालुक्यात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही परिस्थिती लक्षात येताच, मंत्री भुसे यांनी तातडीने शिवसेना पदाधिकाऱ्यांना तालुक्याचा दौरा करण्याचे निर्देश दिले.
या निर्देशानुसार शिवसेना तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, उपजिल्हाप्रमुख सुनील माऊली देवरे आणि प्रमोद पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी काटवन आणि माळमाथा भागातील शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. नुकसानग्रस्त भागाचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांनी मदतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
संकटकाळी आपल्या मतदारसंघातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची मंत्री भुसे यांची भूमिका पुन्हा एकदा दिसून आली आहे. त्यांची ही जनसेवेची तळमळ शेतकऱ्यांच्या मनाला मोठा दिलासा देत आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
Post a Comment
0 Comments