सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर: इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेरची विद्यार्थिनी कु.मालिनी नानाजी शिंदे हिने नुकत्याच पार पडलेल्या धुळे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या ४३ किलो वजन गटात विजय मिळवून तिने नाशिक विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
विद्यालयासाठी आणि पिंपळनेर शहरासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. मालिनीच्या या यशाचे श्रेय तिचे क्रीडा शिक्षक श्री महेश मराठे सर आणि श्री सागर मोहिते सर यांच्या अथक प्रयत्नांना जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने कठोर सराव करून हे यश मिळवले आहे.
मालिनीच्या या कामगिरीबद्दल कै.आ.मा.पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी पिंपळनेरचे संस्थापक अध्यक्ष श्री दादासाहेब सुरेंद्रराव विनायकराव मराठे, संचालक श्री कृणाल गांगुर्डे, श्री यजुर्वेद मराठे, श्री जयेश मराठे, प्राचार्या श्रीमती एस.एस.पवार मॅडम, पर्यवेक्षक श्री डी.पी.कुवर सर, जेष्ठ शिक्षक श्री जे.एन.मराठे सर तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षक बंधु-भगिनींनी तिचे अभिनंदन केले आहे. त्यांनी पुढील नाशिक विभागस्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या असून, तेथेही ती उत्कृष्ट कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
मालिनीच्या या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली असून, क्रीडा क्षेत्रातही चांगले करिअर घडवता येते हे सिद्ध झाले आहे. तिचे हे यश केवळ तिच्या वैयक्तिक प्रयत्नांचे नाही, तर तिच्या पालकांचे आणि संपूर्ण शाळेचे आहे. आता सगळ्यांचे लक्ष नाशिक येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकडे लागून आहे, जिथे मालिनी पुन्हा एकदा आपल्या खेळाचे कौशल्य दाखवेल अशी अपेक्षा आहे.
Post a Comment
0 Comments