सहसंपादक अनिल बोराडे
साक्री: तालुकास्तरीय शालेय पावसाळी क्रीडा स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत १० सप्टेंबर रोजी साक्री येथील क्रीडा संकुलात झालेल्या खो-खो स्पर्धेत कर्म. आ.मा. पाटील माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, पिंपळनेर येथील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
या स्पर्धेत १९ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद पटकावले. तसेच, १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने व १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने उपांत्य फेरीपर्यंत (सेमी फायनल) धडक मारली. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देखील आपल्या शाळेतील विद्यार्थिनीला मिळाला, ही एक अभिमानास्पद बाब आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आर.एन. शिंदे, उपाध्यक्ष एस.व्ही. मराठे, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य पी.एच. पाटील, उपप्राचार्य एस.जे. जाधव, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, क्रीडाशिक्षक आणि सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी अभिनंदन केले.
या संघाला यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक व्ही.ए. दहिते, एस.पी. नांद्रे आणि जे.आर. खैरनार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर, एस.एच. कोठावदे, एस.बी. अहिरे आणि आर.एल. सोनवणे मॅडम यांचेही विशेष सहकार्य मिळाले.
सर्व खेळाडूंचे पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
Post a Comment
0 Comments