Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

माजी ग्रामपंचायत सदस्य कमलबाई कोठावदे यांचे निधन: पिंपळनेर परिसरात शोक

सहसंपादक अनिल बोराडे 

 पिंपळनेर: पिंपळनेर येथील सुप्रसिद्ध सिद्धी हार्डवेअरचे संचालक आणि व्यापारी श्री. देवेंद्र विश्वनाथ कोठावदे यांच्या मातोश्री, तसेच पिंपळनेरच्या माजी ग्रामपंचायत सदस्य कै. कमलबाई विश्वनाथ कोठावदे यांचे आज, दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी पहाटे ३:४५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पिंपळनेर परिसरात आणि राजकीय, सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.



मातोश्री बसंताबाई गोगड बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री. देवेंद्र कोठावदे यांच्या मातोश्री म्हणून त्यांची ओळख होती. कमलबाई यांनी पिंपळनेरच्या माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावकऱ्यांच्या हितासाठी आणि गावाच्या विकासासाठी सक्रियपणे कार्य केले होते. सामाजिक आणि सार्वजनिक कार्यांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असे. त्यांच्या निधनाने एका कर्तव्यदक्ष आणि सामाजिक जाण असलेल्या व्यक्तिमत्वाला पिंपळनेरने गमावले आहे.

त्यांच्या पश्चात एक सुपुत्र (श्री. देवेंद्र कोठावदे), चार सुकन्या, सून, जावई, नात आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिक कोठावदे यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी कै. कमलबाई यांना आदरांजली वाहिली आणि कोठावदे कुटुंबाचे सांत्वन केले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळनेर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments