Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या 11 खेळाडूंची विभागीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड

 सहसंपादक अनिल बोराडे 

धुळे: धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धुळे जिल्हा ज्युडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय ज्युडो क्रीडा स्पर्धेत राजे छत्रपती इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत शाळेची विजयी परंपरा कायम राखली आहे. या स्पर्धेत शाळेतील एकूण ११ खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून विभागीय शालेय ज्युडो क्रीडा स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.



या स्पर्धेत भाग्यश्री जगताप, मयूर ठाकरे, हिना भोई, राणी चौधरी, मुरलीधर जगताप, दर्शन देवरे, अजय गावडे, रोहित माळी, संकेत पाटील, तुषार खैरनार, आणि सुरज पाटील या ११ खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. याव्यतिरिक्त, मृणाली अहिरे, पूनम सुळ, जयपाल गिरासे, रोहित बोरसे, सुधांशू पाटील, जयेश देवरे, कार्तिकेश दहिते, आणि अर्णव कुवर या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशामध्ये भर घातली.

या खेळाडूंना श्री. अहिरराव सर, अमोल अहिरे सर, बाळासाहेब गायकवाड सर, सुनील बहिरम सर, आणि भोई सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

शाळेच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. संभाजी शिवाजी अहिरराव, उपाध्यक्ष श्री. श्याम बेनिराम कोठावदे, सचिव श्री. रा.ना.पाटील, संचालक श्री. जगदीश ओझरकर, श्री. सुनील अहिरराव, श्री. शेखर दळवी, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पाटील यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. एम. के. पाटील, क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा पाटील, आणि श्री. स्वप्निल बोधे यांनीही खेळाडूंचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूंच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments