Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

प्राचार्य डॉ. सतीश पाटील यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

सहसंपादक अनिल बोराडे 

 धुळे: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. सतीश उत्तमराव पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी एका पत्राद्वारे ही माहिती दिली.

डॉ. सतीश पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव म्हणून ही निवड करण्यात आली आहे. डॉ. गोरे यांनी पत्रात म्हटले आहे की, त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे साहित्य परिषदेचे कार्य समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचेल आणि एक सुदृढ समाज निर्माण होईल.



साहित्यातून विचारांची दिशा कळते आणि समाजजीवनाचे प्रतिबिंब उमटते, असे मत डॉ. गोरे यांनी व्यक्त केले. साहित्य निर्मिती ही केवळ कथा, कादंबरी, नाटक आणि कविता यांपुरती मर्यादित नसून, विविध वाङ्मय प्रकारांतून आणि अभ्यासक्रमातूनही ती साकार होते. साहित्याचे आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन या तीन घटकांतून साहित्याची समीक्षा घडते. साहित्यकृतीचा सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थ लावून तिचा त्या काळाशी असलेला अनुबंध तपासणे, साहित्यकृतीचे सामर्थ्य दाखवून देणे आणि लेखन कार्यासाठी दिशा देणे हेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मुख्य कार्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.

प्राचार्य डॉ. पाटील यांच्या निवडीबद्दल परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, जिल्हाध्यक्ष हिरामण सोनवणे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, माजी आमदार कुणाल पाटील, आमदार रोहित पाटील, अध्यक्ष सुरेंद्रराव मराठे, यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, संचालक के. एस. गांगुर्डे, यजुर्वेद्र गांगुर्डे आणि जयेश मराठे यांनीही डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments