सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर : येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साक्री येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. या स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१९ ऑगस्ट २०२५ रोजी साक्री येथील तालुका क्रीडा संकुलात विविध शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात कुस्ती, कॅरमसह इतर खेळांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत इंदिरा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदके जिंकली. विजयी खेळाडूंची नावे आणि त्यांच्या यश खालीलप्रमाणे आहेत:
* कुस्ती : १४ वर्षांखालील मुलींच्या ४२ किलो वजन गटात वैष्णवी पंडित पवार हिने प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील गटात मालिनी नानाजी शिंदे (४३ किलो) आणि धनश्री जयदेव जगताप (५७ किलो) यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक मिळवला.
* कॅरम : १७ वर्षांखालील मुलांच्या कॅरम स्पर्धेत सुभाष शिवाजी सूर्यवंशी याची, तर १७ वर्षांखालील मुलींच्या गटात कल्याणी कर्मा ठाकरे, सोनाली योगेश पवार आणि धनश्री शांताराम चौरे यांची निवड झाली. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात सोनाली अनिल देशमुख आणि निकिता सुधीर मावची यांनी यश मिळवले.
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक महेश मराठे सर, डी.पी. कुवर सर आणि प्रा. जी.ए. गांगुर्डे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कै.आ.मा.पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी पिंपळनेरचे संस्थापक अध्यक्ष श्री दादासाहेब सुरेंद्रराव विनायकराव मराठे, संचालक श्री कृणाल गांगुर्डे, श्री यजुर्वेद मराठे, श्री जयेश मराठे, प्राचार्या श्रीमती एस.एस.पवार मॅडम, पर्यवेक्षक डी.पी. कुवर सर आणि जेष्ठ शिक्षक जे.एन. मराठे सर यांनी अभिनंदन केले आहे. सर्वच स्तरांतून या विजयी खेळाडूंचे कौतुक होत आहे.
Post a Comment
0 Comments