नंदुरबार: दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय आणि मुंबई येथील राज्यस्तरीय रोपस्किपिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून नंदुरबारचे नाव रोशन करणाऱ्या चिरंजीव सार्थक उत्तम कुमार मिस्त्री याचा विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नंदुरबारच्या क्रीडा क्षेत्रात हा एक सोनेरी क्षण ठरला.
सार्थकच्या या यशामागे S. A. Mission High School, नंदुरबार येथील प्राचार्य पराग पॉल आणि धीरज गायकवाड सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्थकने रोपस्किपिंगच्या तांत्रिक बाबी आणि खेळातील बारकावे आत्मसात केले. सरांनी दिलेले प्रोत्साहन आणि शिकवण यामुळेच सार्थकने राष्ट्रीय स्तरावर हे यश संपादन केले.
या गौरव सोहळ्यात श्री दत्तात्रय कराडे यांनी सार्थकचे कौतुक करताना म्हटले की, "सार्थकने केवळ खेळातच नव्हे, तर कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पणाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा या त्रिसूत्रीमुळेच तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे."
सार्थक हा नंदुरबार शहर पोलीस दलातील कर्तव्यदक्ष हेड कॉन्स्टेबल विजया बोराडे व उत्तम कुमार मिस्त्री यांचे सुपुत्र आहे. त्याच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले. या यशाने नंदुरबारमधील इतर तरुण खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आहे.
Post a Comment
0 Comments