Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

साक्री काँग्रेसचा संग्राम भंडारे यांच्या विरोधात तीव्र निषेध; नथुराम गोडसे बनून मारण्याची धमकी दिल्याने कारवाईची मागणी

सहसंपादक अनिल बोराडे 

 साक्री - अहिल्यानगर जिल्ह्यातील घुलेवाडी येथे हरिनाम कीर्तन सप्ताहात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना 'नथुराम गोडसे बनून मारू' अशी धमकी दिल्याप्रकरणी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्याविरोधात साक्री तालुका काँग्रेसने तीव्र निषेध नोंदवला आहे. तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे आणि पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना निवेदन देऊन भंडारे यांच्यावर कठोर कारवाई करून अटक करण्याची मागणी केली आहे.



नेमकं काय घडलं?

घुलेवाडी येथील हरिनाम कीर्तन सोहळ्यामध्ये संग्राम भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना 'तुम्हाला नथुराम गोडसे होऊन मारू' अशी अप्रत्यक्ष धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.




काँग्रेसची मागणी आणि इशारा

या कृत्याचा साक्री तालुका काँग्रेस पक्षाने जाहीर निषेध केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, भंडारे यांच्या या वक्तव्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी. भविष्यात थोरात यांच्यासोबत काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्यासह तालुका सरचिटणीस दिनेश बोरसे, युवक काँग्रेस अध्यक्ष सागर देसले, प्रज्योत देसले, सरचिटणीस पंकज सूर्यवंशी, सुनील बहिरम, राजेंद्र रामोळे, प्रदीप साबळे आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments