Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

साक्रीत वाढत्या गुंडगिरीविरोधात शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे साखळी उपोषण

सहसंपादक अनिल बोराडे 

 साक्री शहरात आणि तालुक्यात वाढलेल्या गुंडगिरी आणि दहशतीविरोधात शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज साक्री तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण केले. शहरातील काही हॉटेलमध्ये बाहेरून महिलांना आणून सर्रासपणे सुरू असलेला देहविक्रीचा व्यवसाय तसेच शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयांजवळ मुलींची वाढती छेडछाड या गंभीर मुद्द्यांवर निवेदनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. अशा टवाळखोर आणि गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या उपोषणाला विविध संघटना आणि नेत्यांनी पाठिंबा दर्शवला. आदिवासी समाजाचे नेते डॉ. रंजन दादा गावित, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) चे तालुका अध्यक्ष कमलाकर भाऊ मोहिते, साक्री शहर व्यापारी असोसिएशनचे विजू शेठ पारख, नवनाथ मित्र मंडळाचे गोटू भाऊ जगताप, तसेच माजी नगरसेवक गणेश सूर्यवंशी आणि रंगनाथ दादा भवरे यांनीही उपोषणाला पाठिंबा दिला.



यावेळी उपोषणात शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक किशोर आप्पा वाघ, शिवसेना साक्री शहरप्रमुख हिम्मत भाऊ सोनवणे, उपतालुकाप्रमुख केशव भाऊ शिंदे, उपतालुकाप्रमुख पप्पू भाऊ माळी, शहर संघटक वैभव भाऊ भिगारे, गोपाळ भाऊ ठाकरे, दिनेश गायकवाड, संदीप शेवाळे, मुकेश बोरसे, आणि राव कारंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. साक्रीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली.

Post a Comment

0 Comments