सहसंपादक अनिल बोराडे
नंदुरबार (प्रतिनिधी): जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील 'राजश्री शाहू महाराज शिक्षक रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नंदुरबार येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात डीवायएसपी संजय महाजन, माजी खासदार (संसद रत्न) डॉ. हिना गावित, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक आत्माराम प्रधान आणि फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. शिंदे यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या प्रशिक्षण, संशोधन आणि सामाजिक नवोपक्रमांसाठी सातत्यपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या अतुलनीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमने घेतली, आणि म्हणूनच त्यांना नंदनगरीत या मानाच्या 'राजश्री शाहू महाराज शिक्षक रत्न' राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
या महत्त्वपूर्ण यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे, उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, सचिव डॉ. अभिजीत मोरे, तज्ज्ञ संचालक अॅड. राऊबाबा मोरे, प्राचार्य डॉ. सतीश देवरे, प्राचार्य डॉ. रवींद्र पाटील, प्राचार्य तेजस्विनी वसावे यांच्यासह अनेक शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
Post a Comment
0 Comments