सहसंपादक अनिल बोराडे
धुळे: सामाजिक बांधिलकी जपत आणि रचनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग चि. अमोल शांताराम पाटील यांचा ३४ वा वाढदिवस विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. यानिमित्त वृक्षारोपण आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास मदत निधी देऊन अमोल पाटील यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
अमोल पाटील यांनी यापूर्वीही सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे. जुलै २०२० मध्ये कोविड महामारीच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला ११,००० रुपये दिले होते. तसेच, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अनेक आदिवासी वाचनालये आणि अभ्यासिकांना MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, NDA सारख्या स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट दिली आहेत.
या वर्षीच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त अमोल पाटील यांनी कन्हैयालाल महाराज मंदिरासाठी एक किलो पितळ खरेदीसाठी १,१०० रुपये दिले. याव्यतिरिक्त, देशाच्या कल्याणासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलीस आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला २,१०० रुपये रोख मदत दिली.
पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने, वनसंवर्धन दिनानिमित्त मागील वर्षी लावलेल्या वृक्षांचे जतन करून त्यांचे पूजन करण्यात आले. तसेच, यंदा साग, आवळा, आंबा, चिंच, जांभूळ, लिंबू, रेन ट्री, कनेर, मोगरा अशा विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी. एम. सावळे यांनी केले, तर सूत्रसंचालन ईश्वर ठाकरे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. जि. प. सदस्य ॲड. ज्ञानेश्वर एखंडे, संभाजीराव अहिरराव, सामोडे येथील सरपंच आरतीताई भारुडे, उपसरपंच रावसाहेब घरटे, पिंपळनेर पो. स्टे. चे ए.एस.आय. आय.जी. शिरसाट, जयेश मराठे, नेत्र विशारद डॉ. अरुण ओझरकर, ओरिसा येथील सुरेंद्र महाकुड, डॉ. विनोद कोठावदे, ए. पी. दशपुते, प्रा. सी. एन. घरटे, किशोर विसपुते, भरत बिरारीस, फकीरा बिरारीस, जगदीश शिंदे, हंसराज शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास कोळी, नरेंद्र परदेशी, ग्रा. वि. अ. सुनील लाड, फुलसिंग कुवर, शिवचंद्र भदाणे, सुशील पाटील, दीपक राजपूत, सुरेश अहिरे, चिंतामण ठाकरे, अभि महाकुंड, आकाश माळी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी वृक्ष लागवड करून चि. अमोल पाटील यांना मौल्यवान शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शतकोटी हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. अमोल पाटील यांनी आपल्या कार्याद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा दिली आहे.
Post a Comment
0 Comments