Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या वतीने कर्मवीर आ.मा. पाटील महाविद्यालयात अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

 सहसंपादक अनिल बोराडे 

पिंपळनेर (तालुका साक्री): जागतिक अमली पदार्थ दिनाचे औचित्य साधून आज, गुरुवार, २६ जून २०२५ रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशनतर्फे कर्मवीर आ.मा. पाटील कला, वाणिज्य महाविद्यालयात अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल सविस्तर माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले.



सकाळी ११.०० ते दुपारी १२.३० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पवार सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबतच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सुमारे ४०० ते ४५० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम तसेच त्यापासून दूर राहण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले.



सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पुढाकाराने आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने सदर जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारच्या जनजागृतीमुळे युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments