सहसंपादक अनिल बोराडे
दहिवेल, (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा दहिवेल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ६ जून, शुक्रवारी सकाळी ९ वाजता शिवभक्तांनी मोठ्या संख्येने शिवस्मारकावर उपस्थिती लावली. यावेळी शिवस्मारकावर दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. संपूर्ण परिसर 'जय शिवाजी, जय भवानी' च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून दहिवेलमधील शिवतीर्थ चौकातील तरुण शिवप्रेमी हा ऐतिहासिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. या निमित्ताने शिवप्रेमी एकमेकांना शुभेच्छा देतात आणि महाराजांच्या शौर्याची व दूरदृष्टीची आठवण करून देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये रायगडावर राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हा दिवस मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण मानला जातो. या सोहळ्यामुळे नव्या पिढीला महाराजांच्या कार्याची प्रेरणा मिळते आणि त्यांचे विचार समाजात रुजतात.
यावेळी ग्रामपंचायतचे ग्राम विस्तार अधिकारी श्री अशोक बच्छाव, सरपंच प्रकाश वळवी, उपसरपंच श्री नंदकुमार महाले, शिवप्रेमी श्री आनंदा शिवलाल बच्छाव, मा. प्राचार्य श्री अरविंद दहिविलकर सर, श्री अरुण नारायण बच्छाव, धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष श्री संदीप बच्छाव, संचालक श्री संजय कालेश्वर बच्छाव, श्री किशोर बच्छाव, श्री दिनेश गुरव, प्रमोद पाटील, मनोहर बच्छाव यांसह अनेक शिवप्रेमी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या सोहळ्यामुळे दहिवेलमध्ये शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
Post a Comment
0 Comments