नवापाडा, ता. साक्री: राजमोहिनी देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी आश्रमशाळा) नवापाडा येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मा. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मनीष सूर्यवंशी उपस्थित होते. आश्रमशाळा नवापाडा येथील कर्मचारी एन.बी. सूर्यवंशी, ए.आर. उमाळे, एस.ए. लहामगे, आर.एस. पवार, जे.के. कोकणी आणि मुजगे हेदेखील उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान, डॉ. मनीष सूर्यवंशी यांनी उपस्थितांना पर्यावरणाचे संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत, या संदर्भात जागरूकता वाढवण्यावर भर दिला. या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली.
Post a Comment
0 Comments