सहसंपादक अनिल बोराडे
धुळे, गोवा राज्यातून गुजरातकडे बेकायदेशीररित्या विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरला धुळे स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरित्या पकडले असून, या कारवाईत सुमारे ६३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, गोवा राज्यातून धुळे-शिरपूर मार्गे गुजरातकडे एक टाटा कंपनीचा ट्रक (क्रमांक एम एम १३ डि क्यु ९९६६) बेकायदेशीररित्या विदेशी दारुचे बॉक्स घेऊन जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
राष्ट्रीय महामार्गावर गोंडावन पांढर येथे सदर वाहनाला थांबवण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता, चालकाने आपली ओळख १) शुभाकर राजाराम माने (वय ५०, रा. सावळद, ता. वाळवा, जि. सांगली) आणि २) विनायक शिवाजी सपकाळे (वय २६, रा. रहि, ता. मावळ, जि. सोलापूर) अशी सांगितली.
जप्त केलेला मुद्देमाल:
या कारवाईत पोलिसांनी एकूण ५१ लाख ४ हजार रुपये किमतीच्या 'रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की'चे १९० बॉक्स जप्त केले. प्रत्येक बॉक्समध्ये ५० बॉटल होत्या आणि प्रत्येक बॉटलची किंमत १०० रुपये होती. या दारुच्या बॉटल्स प्लास्टिकच्या होत्या.
याव्यतिरिक्त, दारु वाहतुकीसाठी वापरलेला टाटा कंपनीचा ट्रक (मॉडेल क्रमांक १९१६, एम एम १३ डि क्यु ९९६६, पांढरा रंग) देखील जप्त करण्यात आला, ज्याची किंमत २२ लाख रुपये आहे.
अशा प्रकारे, या कारवाईत एकूण ६३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस प्रशासक तांदळे, असई संय्यद पाटील, पो हे कॉ पवन गवळी, आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर आणि पो कॉ मयुर पाटील यांच्या सह पुर्ण टिम ने कारवाई केली.
Post a Comment
0 Comments