सहसंपादक अनिल बोराडे
जवळपास एक महिना होत असताना चिमठाणे रोड वरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर झालेल्या आदिवासी तरुण विजय भिमराव भिल यास मारहाण करणाऱ्या हल्लेखोर आरोपीना अद्याप ही अटक व कोणतीही कारवाई शिंदखेडा व शिरपूर पोलीस अधिकारी करवी झाली नसल्याने भिल समाज विकास मंचचे अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर डब बजाओ आंदोलन करण्यात आले. विविध पोलीस प्रशासन विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
सदर आदिवासी तरुणावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपीना पाठिशी घालणारे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरपूर व पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांना त्वरित निलबित करा अशी मागणी भिल समाज विकास मंचचे संस्थापख दिपक अहिरे सह पदाधिकारी यांनी केली. हयावेळी शिंदखेडा सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी तीन दिवसात हल्लेखोर आरोपीना अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
अज्ञात हल्लेखोरावर पुरवणी अट्रॉसिटी गुन्हा (रजिष्टर नं 65/1025 ) दाखल केला आहे.वेळोवेळी निवेदन, तक्रार, मोर्चा, आंदोलन करुनही सदर घटनेला 30 दिवस उलटुनही हल्लेखोर आरोपी पोलीस अधिकारी कडून सापडत नाही म्हणुन शिंदखेडा पोलीस स्टेशनला सक्षम कर्तव्यदक्ष अधिकारीची नेमणूक करावी आणि त्वरित हल्लेखोर आरोपीना जेरबंद करून आदिवासी तरुणाला न्याय मिळावा अन्यथा येत्या आठ दिवसात नाशिक येथे पोलीस महानिरीक्षक यांच्या दालनात डफ बजाओ आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला .
हयावेळी अध्यक्ष दिपक अहिरे, आदिवासी वाल्मिकलव्य सेना प्रमुख शानाभाऊ सोनवणे,जिल्हासचिव अशोक सोनवणे,मुळ फिर्यादी विजय भिल,राजेश मालचे, बापु ठाकरे, सुरेश सोनवणे, भिमराव आखाडे, जयसिंग भिल,सुखराम सोनवणे, श्रीराम मोरे, आनंद मोरे,शामा ठाकरे, कालु मोरे, करणसिग पाडवी,महेंद्र भिल, समाधान मालचे,न्हानभाऊ सोनवणे, चंद्रदिप अहिरे,बारकु मालचे, रामभाऊ मालचे,आदी सह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.
Post a Comment
0 Comments