नवापूर प्रतिनिधी 09/04/2025रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल सो चिंचपाडा व स्टाफ सह मौजे वावडी येथील कच्च्या रस्त्याला दबा धरून थांबलो असता वाहन चालकास वनकर्मचाऱ्याची चाहूल लागताच वाहनचालक सदर वाहन सोडून पसार झाला . सदर *वाहन क्र.MH 19 AE 8251* वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात खैर प्रजातीचे तासतुस केलेले गोल नग अवैध रित्या विनापासी ,विनाशिक्क्याचे मिळून आले .सदरील वाहन व मुद्देमाल जप्त करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केले.सदर जप्त मालाचे मोजमाप घेतले असता खैर प्रजातीचे एकूण नग *89* मिळून आले व *0.972 घ.मी* मिळून आले . सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत *40000* रुपये व वाहनाची किंमत *300000* असून .
सदर गुन्हयाबाबत वनरक्षक चिंचपाडा श्री.दिनानाथ कोकणी
यांनी गुन्हा नोंदविला.
. सदर कारवाई मा.श्रीमती निनू सोमराज मॅडम, वनसंरक्षक सो.धुळे( प्रा.)मा.श्री.संतोष सस्ते सो. उपवनसंरक्षक सो.नंदुरबार वनविभाग नंदुरबार ,मा. राजेंद्र सदगीर सो. विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे ,मा.श्री धनंजय पवार सहाय्यक वनसंरक्षक सो(प्रा व वन्यजीव .) नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सो. चिंचपाडा ( प्रा) मा. श्री मंगेश चौधरी.यांच्या नेतृत्वाखाली वनपाल सर्वश्री संजय बडगुजर ,सुजित बेडसे ,वनरक्षक सर्वश्री श्री.दीनानाथ कोकणी ,श्री.इलान गावीत , श्री. रामदास पावरा, श्री देवमन सुर्यवंशी ,श्री अमोल जे . गावित .श्री अमोल डी.गावित श्री शिवराम गावित तसेच वनमजूर जयू गावित, पांड्या गावित ,दशरथ गावित,अमित गावित व वाहन चालक श्री. बाळा गावीत यांनी कारवाई केली .
Post a Comment
0 Comments