Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमांची परीक्षेआधीच तयारी पूर्ण करावी...प्रा शिवाजी पाटील

सहसंपादक अनिल बोराडे 

 परीक्षेदरम्यान प्रत्येकाने विद्यापीठ परीक्षा नियमांचे  तंतोतंत पालन करावे. पर्यवेक्षकांनी परीक्षा सुरु होण्याआधी सर्व संबंधित परीक्षार्थींना उत्तरपत्रिकेवरील, विद्यापीठाने दिलेले रकाने व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरून घेतल्यास विद्यार्थ्यांच्या निकालादरम्यान उदभवणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळता येणे आपल्या हातात असल्याचे प्रतिपादन जळगाव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.शिवाजीराव पाटील यांनी केले.

       कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे मा.कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी साहेब यांच्या निर्देशानुसार पिंपळनेर येथील कर्मवीर आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात " परीक्षा जाणीव-जागृती " या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाट्न कवयित्री बहिणाबाईंच्या प्रतिमा पुजनाने झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी पिंपळनेर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू पवार, परीक्षा विभागाचे डॉ. मनोज बळसाणे,प्रा. डी. बी. जाधव, प्रा.सी. एन. घरटे, आयक्यूएसी संयोजक डॉ. एस. पी. खोडके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

         मार्गदर्शन करतांना पाटील पुढे म्हणाले की सर्व पर्यवेक्षक, उत्तरपत्रिका तपासणारे प्राध्यापक, मॉडरेटर, पेपर सेटर इत्यादींनी परीक्षा कामकाज पूर्ण करतांना अधिकची दक्षता घ्यावी.अभ्यासासोबत परीक्षेबाबत परीक्षार्थींना योग्य ती जागृती केली तर सक्षम व गुणवत्ताधारक विद्यार्थी बाहेर पडतील.

           कार्यशाळेचे अध्यक्ष पिंपळनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पवार यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अभ्यास करावा. परीक्षेच्या काळात प्रत्येक परीक्षार्थीने तणावमुक्त राहावे. वेळेवर आहार घ्यावा. प्राध्यापकांनी आपल्या ग्रामीण भागाच्या महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत पारदर्शक परीक्षा पार पाडाव्या आणि विद्यापीठाला सर्वतोपरी सहकार्य करावे. 

         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यशाळा संयोजक डॉ. मनोज बळसाणे, परिचय प्रा. चंद्रकांत घरटे यांनी केले. आभार प्रा. डी. बी. जाधव यांनी मानले. सदर कार्यशाळेसाठी डॉ.योगेश नांद्रे, डॉ.नितीन सोनवणे, डॉ.संजय खोडके, प्रो.सतीश मस्के, डॉ.संजय तोरवणे, डॉ. आनंद खरात, प्रा. एल. जे. गवळी, डॉ. के. एन. वसावे, कार्यालयातील बी. ए. शिंदे, के. एन. कुवर, एस. ए. बेणूस्कर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पिंपळनेर येथील कला,वाणिज्य, व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात "परीक्षा जाणीव-जागृती" कार्यशाळेच्या उदघाट्न प्रसंगी  जळगाव विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.शिवाजीराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू पवार, डॉ. बळसाणे, डॉ. संजय खोडके,प्रा. जाधव, प्रा. घरटे आदी उपस्थित होते....



Post a Comment

0 Comments