दि. 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी खामगांव-शेगांव रोडवरील ब्रम्हांडनायक लॉन्स समोर एसटी बस, ट्रॅव्हल्स व बोलेरो अपघातामध्ये 6 मृत व 17 जखमी झाले आहेत. मृत व्यक्ती व जख्मी व्यक्तींची माहिती पुढीलप्रमाणे.
प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीप्रमाणे मृतकांची नावे याप्रमाणे :1) धनेश्वर मरावी रा. मध्यप्रदेश, 2) कृष्णकुमार मोहन सिंह सरोते वय 20 वर्ष, 3) शिवपाल संतकुमार संयम वय 21 वर्ष रा. मध्यप्रदेश, 4)शिवाजी समाधान मुंडे वय 55 वर्ष रा. एसबीआय कॉलनी शेगाव, 5) रंजीत वानखेडे वय 40 वर्ष रा. मूर्तिजापूर 6)इंद्राणी टॅ्रव्हल्स मधील मेहरुनिसा शेख हबीब वय 45 वर्ष रा. धुळे मालेगाव असे एकूण 5 पुरुष व 1 महिला मयत झाले आहेत.
प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीप्रमाणे जखमी व्यक्तींची नावे याप्रमाणे : 1)शिव धनसिह धुर्वे वय 47 वर्ष रा. मध्यप्रदेश, 2)कोमल गणेश गंधारे वय 59 वर्ष रा. अहमदनगर, 3)प्रतीक्षा मुकुंदराव वांगे वय 26 वर्षे रा. ब्राम्हणवाडा थळी ता. चांदुर बाजार अमरावती. 4)सत्यपाल गुलाबराव गवई वय 40 वर्ष रा.लावखेड ता. पातुर जि.अकोला, 5)सुमन सुखदेवराव भोंडे वय 70 वर्ष रा. अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती. 5)सुखदेव अमृत भोंडे वय 81 वर्ष रा. अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती, 7)दत्ता रामधन मोरखडे वय 45 वर्ष रा. हिवरखेड रुपराव ता. तेल्हारा, 8)बापूराव रामकृष्ण सवाने वय 80 वर्षे रा. वझर मे ता. निफाड जिल्हा नाशिक, 9)साजिया परवीन शेख हबीब वय 10 वर्ष रा. धुळे मालेगाव, 10)शेख हबीब अब्दुल रजाक वय 50 वर्षे रा. धुळे मालेगाव, 11)धनराज नागोराव उगले वय 37 वर्ष रा. बिलोरा विमानतळ अमरावती, 12)आशिष सुखदेवराव नवले वय 40 वर्ष रा. अमरावती, 13)प्रल्हादराव शिवरामजी आवंडकर वय 75 वर्ष रा. अंजनगाव सुर्जी, 14) वरद चित्रांगण रेवंदले वय 6 वर्ष रा. फुरसुंगी पुणे, 15)वंदना देवानंद पांडवकर वय 51 वर्ष रा. अंजनगाव सुर्जी, 16)पुरुषोत्तम नारायण शिनकर वय 72 वर्ष रा. करजगाव तालुका चांदुर बाजार, 17)शालिनी पुरुषोत्तम शिनकर वय 65 वर्ष रा. करजगाव तालुका चांदूरबाजार.
सदर जखमी व्यक्तींवर सामान्य रुग्णालय खामगाव व जिल्हा सामान्य रुग्णालय आकोला येथे उपचार सुरु आहेत, अशी माहिती तहसिलदार खामगाव सुनिल पाटील यांनी दिली.
Post a Comment
0 Comments