सहसंपादक अनिल बोराडे
सामोडे घोड्यामाळ भागातील गटारीवरील अतिक्रमण काढण्यास पंचायतीच्या अक्षम्य कारवाई विरोधात सात एप्रिल रोजी महिलेचा आत्मदहनाचा इशारा.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वरिल संदर्भिय विषयाला अनुसरून ज्योती भोलेनाथ गवांदे यांच्या ताबेउपभोगात असलेल्या घराच्या मागे ग्रामपंचयात सामोडे, ता. साक्री जि. धुळे हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत मालमत्ता क्र. २१३१ वर ६ × १९ ची जागा श्रीमती. रत्नाबाई लक्ष्मण मंडाळे व त्यांचे पती श्री. लक्ष्मण नारायण मंडाळे यांनी विकत घेतली व १२० ४० चे घर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधले. त्यानंतर सदर जागा मनोज देवाजी मोरे यांना विकली व त्यांनी सामोडे ग्रामपंचायतीला हाताशी धरून सदर जागा स्वतःच्या नावे करून घेतली.
सदर जागेच्या पश्चिमेच्या बाजूस सामोडे ग्रामपंचायत मालकीची गावठाण जागा आहे. त्याजागेवर सांडपाणी, गटारीची पाईप लाईन व गटारीचे चेंबर बांधकामाच्या उपयोगासाठी आहे. असे असतांना त्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केलेले आहे. अतिक्रमण केलेली जागा ही वहिवाट रस्ता १३ फुटाचा असतांना अतिक्रमणामुळे आता फक्त ६ फुटाचा रस्ता शिल्लक उरला आहे. त्यामुळे सौ.गवांदे स्वतःला व परिसरातील नागरिकांना या अतिक्रमणाचा प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. सदर अतिक्रमण निष्कासित करण्यात यावे यासाठी ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सामोडे ता. साक्री जि. धुळे, गट विकास अधिकारी पंचायत समिती, साक्री यांना प्रत्यक्ष भेटून व वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रार अर्ज व निवेदने देण्यात आली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. वास्तविक गावठाण व गायराण जमिनीबाबत मे. उच्च न्यायालय मुंबई दि. ६ आक्टोंबर २०२२ रोजी दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी साहेबांना आदेश व निर्देश जारी केलेले आहेत. तसेच यापूर्वी मे. सर्वोच न्यायालयाने सिव्हील अपिल क्र. ११३२/२०११ मध्ये दि. २८/१/२०११ च्या निर्णयात म्हटले आहे की, गावठाण जागेवरील अतिक्रमण (काही अपवाद वगळता) निष्कासित करावी व भविष्यात अतिक्रमण होणार नाही याची दक्षता संबंधीत अधिकाऱ्यांनी घ्यावीत असा आदेश देऊनही मे. न्यायालायच्या आदेशाचे पालन झालेले नाही. तसेच याबाबत मा. जिल्हाधिकारी साो. धुळे जा.क्र./२०२२/ब-/ कक्ष-१/गावठाण /कावि/८४८/२०२२ दि. ९/११/२०२२ च्या पत्राद्वारे सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय व गायराण जमिनीवर असलेल्या अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्या बाबत आदेशीत केलेले आहेत.
ग्रामपंचायत सामोडे यांनी सदर अतिक्रमण काढून घेण्यासाठी संबंधीतांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत तसेच अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तासाठी पिंपळनेर पोलीस स्टेशनला लेखी पत्राद्वारे विनंती देखील केलेली आहे. परंतु मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक साो. पोलीस स्टेशन पिंपळनेर यांनी सांगीतले की, जो पर्यंत मा. पोलीस अधिक्षक साो. धुळे यांचा आदेश मिळत नाही तो पर्यंत अतिक्रमण निष्कासित साठी पोलीस बंदोबस्त दिला जाणार नाही. ग्रामपंचायत सामोडे यांनी व मी स्वतः अतिक्रमण काढण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक साो. धुळे यांच्याकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी करूनही कुठलाही पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. यावर माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहितीची मागणी करण्यात आली त्यात देखील माहिती न मिळाल्यामुळे प्रथम अपिल दाखल करण्यात आले त्यात त्याची सुनावणी होऊन सात दिवसात माहिती देण्याचे दि. २६/११/२०२४ रोजी आदेश झालेत, परंतु अद्याप मला कुठलीही माहिती मिळालेली नाही व अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळालेला नाही.
गाव पातळीवर अतिक्रमण निष्कासित करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असतांना ग्रामपंचायत सामोडे हे पिंपळनेर पोलिसांवर जबाबदारी ढकलत आहेत तर पिंपळनेर पोलीस हे पोलिस अधिक्षक धुळे यांच्यावर जबाबदारी ढकलत आहे व पोलीस अधिक्षक धुळे हे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देत नाहीत. संबंधीत अधिकारी सदर अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी जाणुन बुजून दिरंगाई करीत आहेत. तरी कृपया या प्रकरणाची वरीष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी व वाहतुकीला अडथळा ठरत असलेले शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण त्वरीत निष्कासित करण्यात यावे व अतिक्रमण करणाऱ्यांवर त्वरीत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही नम्र विनंती.
सदर माझी मागणी एका महिन्यात पूर्ण न झाल्याने मी दि. ७ एप्रिल २०२५ सोमवार रोजी ग्रामपंचायत सामोडे ता. साक्री जि. धुळे यांच्या प्रांगणात आत्मदहन करणार आहे. यात माझा मृत्यू झाल्यास यास कारणीभूत ठरलेल्या व्यक्ती व अधिकारी हे व्यक्तीश जबाबदार राहतील. व त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती.
Post a Comment
0 Comments