सहसंपादक अनिल बोराडे
धुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या काही धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आला आहे, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अक्कलपाडा धरणातील पाणीसाठा 55 टक्के शिल्लक असून, इतर कमी क्षमतेच्या धरणातील पाणीसाठ्यांची टक्केवारीसुद्धा कमी झाली आहे, त्यामुळे या धरणक्षेत्र अंतर्गत असलेले हजारो हेक्टर सिंचन क्षेत्रही संकटात सापडले आहे, वेळीच पाऊस न पडल्यास धुळे शहरासह जिल्हावासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे, यामुळे आगामी काळात पाणी जपून वापरावे लागणार आहे,
धुळे पाटबंधारे विभाग अंतर्गत लाटीपाडा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी, अमरावती, सुलवाडे हे महत्त्वाचे 12 मध्यम, तर सुमारे 45 लहान-मोठे लघु प्रकल्प आहेत, जिल्ह्यात गत हंगामात समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील सर्व मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला होता. गेल्या वर्षी दुष्काळाचे चटके सहन कराव्या लागलेल्या धुळे जिल्ह्यात गत हंगामात समाधानकारक पाऊस राहिल्याने जुलै महिन्यातच जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते, प्रकल्प भरल्याने नदी, नाले देखील तुडूंब भरून वाहत होते. नदी, नाल्यांना मोठे पूर देखील आले होते. अशातच सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने त्यात वाढ झाल्याने जिल्ह्यातील अनेक नाले अगदी जानेवारीपर्यंत प्रवाहित होते, परंतु एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणात झाले असल्याने, जलसाठ्यांमध्ये निम्म्यावर पाणीसाठा ऊरला असल्याने आगामी काळात धुळे जिल्ह्यात पाणीबाणीच संकट उभ राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Post a Comment
0 Comments