सहसंपादक अनिल बोराडे
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली "बॉईज असोसिएशन"सामाजिक शैक्षणिक व पोलिसांच्या परिवारासाठी अहोरात्र काम करीत आहे संपूर्ण महाराष्ट्रात पोलिस बॉईज असोसिएशन चे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते सक्रीय असुन पोलिस भरतीत पोलीसांच्या मुलांना 5 % आरक्षण मिळवुन देणारी एकमेव संघटना आहे पोलिस बॉईज मुलांच्या हितासाठी लढणारी एकमेव संघटना आहे या संघटने मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात अशातच नूतन कॉलनी परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वागत कमान उभारण्यात आली होती.
या कमानीतून जाणाऱ्यांना 'वाचाल तर वाचाल' हा उपक्रमांतर्गत सर्व महापुरुषांचे
पुस्तकाचे वाटप करण्यात आले. पोलिस बॉइज असोसिएशनचे अध्यक्ष रवी वैद्य,
विजय वडमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो.
यावेळी अनिल मालुसरे, माणिक निमसे, गोकुळ दाभाडे, प्रा. धर्मराज होलिये, योगेश
सदाशिवे, माउली सुरळकर, अरुण दाभाडे, भांबर्डे महाराज, शिरीष चव्हाण, सुनील
पारखे, सागर बनसोडे, आकाश सुरडकर, संजय फटांगडे, अक्षय तळेकर, संतोष
सोनवणे, रोनित जाधव, नरेंद्र नेरकर, गौरव हावसरे, महिला आघाडीच्या माया महानोर,
जयश्री दाभाडे, स्मिता जोशी, शीतल खरात, प्रणिता थोटे, सुप्रिया चव्हाण, रेखा थिटे,
रिंकू केशवे, अलका खरात व राजश्री पोफळे आदींनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
Post a Comment
0 Comments