Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पिंपळनेर च्या पश्चिम पट्ट्यात सध्या महुफुले वेचणीचा हंगाम सुरू झाला असुन सध्या पश्चिम पट्ट्यात महुफुलांचा सुगंध दरवळतो आहे.

 सहसंपादक

अनिल बोराडे 



पिंपळनेर च्या पश्चिम पट्ट्यात आदिवासी बहुल भागात महुची हजारो झाडे असुन ते वनक्षेत्र व खाजगी गटात देखील आहे. महुफुलांचे उत्पादन हे त्या महु झाडाच्या आकारावरून असते.

        महु हा दोन प्रकारचा असतो असे स्थानिक सांगतात काही मोहाची फुले रात्री पडतात त्यांना रातगळ दिनगळ असे म्हणतात.

       पश्चिम पट्ट्यात आता वन धन विकास केंद्रांची बारीपाडा , मोहगाव, चावडीपाडा ता.साक्री येथे सुरूवात झाली आहे. येथील वन धन केंद्राने कल्पतरू मोहाच्या झाडाचा बिजनेस प्लॅन बनविला आणि तो शबरी आर्थिक विकास महामंडळाला सादर केला.

          पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधवांच्या जीवनात महत्वाचे स्थान असलेल्या कल्पतरू महुच्या झाडापासून मिळणारे फुले, टोळंबी यांच्या पासुन विविध सौंदर्य प्रसाधने, वाईन, मनोके, साबण, चाँकलेट, महुतेल तयार होत असुन ते सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

      कल्पतरू महु वृक्ष हा आकाराने मोठा व घनदाट छाया देणार वृक्ष आहे, या वृक्षापासुन घनदाट छाया, फुलांपासून मद्य(दारू), वाईन, मनोके विविध वस्तू व फळांपासून (टोळमी) तेल , साबण विविध वस्तू बनवतात. या पश्चिम पट्ट्यातील वन धन केंद्रात वन उपज महुफुले व टोळमी खरेदी करून त्यापासून तेल निर्मिती देखील सुरू केली आहे. त्यामुळे आदिवासी शेतकरी मालामाल होणार आहेत.

पश्चिम पट्ट्यात बारिपाडा, चावडीपाडा, मोहगाव या तीनही ठिकाणी सन-2018/19 मध्ये

वन धन केंद्राची स्थापन करण्यात आली या केंद्रांतर्गत तीनही गावात 15

बचत गटांची स्थापना केली असुन त्या बचतगटाच्या माध्यमातून महु फुले वेचणी करणे, तेल घाणा, पत्रावळी, भगर तयार करण्यातचे काम देखील केले जाते.

     पश्चिम पट्ट्यात अंदाजे 

साधारणतः 15 ते 20 हजार महूची झाडे असतील. आदिवासी बांधवांच्या जीवनात या झाडाचे मोठे महत्व आहे. प्रत्येक आदिवासी कुटुंबाकडे एकतरी महूचे झाड असतेच. त्यापासून निघणारे फूल, टोळंबी यांचा वापर त्यांच्या जीवनात महत्वपूर्ण आहे. आता हेच झाड आदिवासी कुटुंब आणि शेतकऱ्यांना मालामाल करणार आहे. 

       बारिपाडा, मांजरी, चावडीपाडा, मोहगाव, मापलगाव, उम-यामाळ, मोगरपाडा, वडपाडा, शेंदवड, केवडीपाडा, मावचीपाडा, पिपळपाडा या गावाच्या वनक्षेत्र व पडित, वहित या क्षेत्रावर साधारण पणे 10 ते 12 हजार मोहाची झाडे विखुरलेल्या स्वरुपात मोठ्या प्रमाणात आहेत.

         महूच्या झाडापासून फूल आणि फळातील बिया अर्थात टोळंबीपासून विविध पदार्थ तयार केले जातात. आयुर्वेदातही महूला मोठे स्थान आहे. टोळंबीपासून तयार होणारे तेल आहार, आरोग्य, औषध, सौंदर्य प्रसाधनात खूप महत्व आहे.

-----------------------------------------

■ उपलब्ध महू आहे: २० ते २२ हजार.


■ एका झाडापासून सरासरी टोळंबी अंदाजे- दोन क्विंटल (झाडाच्या आकारानुसार)


■ एक किलो टोळंबीचा दर ५० रुपये,


■ तीन किलो टोळंबीपासून मिळणारे तेल : 900 ते 1000 मि. ली.


• प्रतिकुटुंब वार्षिक टोळंबी उत्पादन- दोन ते अडीच क्चिंटल.


• प्रक्रिया खर्च: आधुनिक यंत्राच्या साहाय्याने 5 रू रुपये किलो प्रमाणे टोळमी तेल काढून देणे.

 * बियांपासून तयार केलेले महू तेल हे पूर्णपणे सेंद्रिय असते.

--------------------------------------------

         महु तेलाचा आयुर्वेदिक उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जातो त्यात खाण्यासाठी (स्वयंपाकासाठी), लखवा झाल्यास मालिस करण्यासाठी,

आरोग्य, औषधी त्यामुळे त्याचे आहार, आरोग्य, औषध, सौंदर्य प्रसाधनात खूप महत्व आहे. टोळंबी तेलाचा वापर हा दैनंदिन आहारात खाण्यासाठी, पोटातील जंत, कृमी यावर औषध

म्हणून, अकाली पांढऱ्या केसांवर चेहऱ्याच्या सुरकुत्या घालविण्यासाठी व सौंदर्य प्रसाधनांसह साबण निर्मिती त्वचारोग, सांधेदुखीवर मसाज आदींसाठी केला जातो.

       

वन धन केंद्रामार्फत महुफुले मातीत मिसळून नये म्हणून जाळी व ताडपत्री देण्यात आली असुन, महुफुले ज्या ठिकाणी पडतात त्या जागेवर ताडपत्री अंथरूण देणे जेणेकरून फुले त्या जाळी किंवा ताडपत्री वर पडतील.

Post a Comment

0 Comments