Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवसैनिकांनी वाचला समस्यांचा पाडा नागरिकांनी विविध समस्यांच्या करावा लागतो सामना

 सहसंपादक अनिल बोराडे 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने नगरपरिषद पिंपळनेर मुख्याधिकारी श्री. दिपक पाटील यांना आपल्या कार्यक्षेत्रातील पिंपळनेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या रोशन नगर, इंदिरानगर, संजयनगर, परिसरात गटार नसल्यामुळे सांडपाणी चा योग्य निचरा होणे बाबत शिवसेना पिंपळनेर शहरप्रमुख महेश वाघ व परिसरातील महिला भगिनींनी निवेदन दिले.



वरील उपरोक्त विषयानुसार आपणास निवेदन देऊन इच्छितो की पिंपळनेर रोशन नगर, इंदिरानगर, संजय नगर, येथे गटार नसल्यामुळे रस्त्यावर सांडपाणी येत असून नागरीकांना अनेक साथीच्या आजाराना सामोरे जाव लागत आहे, अनेक समस्या निर्माण होत असल्याने संबंधित नगरपरिषदेने जातीने लक्ष घालून एका आठवड्यात ह्या जीवघेण्या समस्येतून मुक्त करावे. अन्यथा शिवसेना (ठाकरे) गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

यावेळी उपस्थित शिवसेना पिंपळनेर शहरप्रमुख महेश वाघ, उपशहर प्रमुख बाबा शेख, सलीम पटेल, इजाज पिंजारी, सौ.मनीषाताई पाटील, सौ. स्वातीताई कोठावदे, पवार बाई, आदी महिला भगिनी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments