संपादकीय
समर्थ विहीर, कोकणी हील (ता. नंदुरबार) येथील रहिवासी व नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्री. जगदीश सोनवणे (वय ५७) यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही दुर्दैवी घटना काल रात्री नवापूर तालुक्यातील लहान कडवान येथे घडली. श्री. सोनवणे हे त्यांच्या दुचाकी क्रमांक MH ३९ AH २३७१ वरून प्रवास करत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची फिर्याद लहान कडवानचे पोलीस पाटील श्री. विनायक गावीत यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र साबळे, विसरवाडी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
श्री. जगदीश सोनवणे हे नवापूर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते ते कर्तव्यदक्ष आणि मनमिळाऊ अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्युज चॅनल प्रतिनिधी गणेश सोनवणे
Post a Comment
0 Comments