Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

धुळ्यातून चोरी गेलेले हायवा डंपर २४ तासांत हस्तगत; आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक

 सहसंपादक अनिल बोराडे 


धुळे: दिनांक २३/०४/२०२५ रोजी फिर्यादी सुरेश शालीग्राम देवरे (वय ४२, व्यवसाय-ड्रायव्हर, रा. रोलावेर, चिंचखेड) यांचे मालकीचे ३५,००,०००/- रुपये किंमतीचे हायवा डंपर (क्रमांक MH-१८-BZ-९३९३) त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ११६/२०२५, भा.दं.वि. कलम ३७९) दाखल केला होता.



गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दीपक पाटील यांच्या सूचनेनुसार तपास पथके तयार करण्यात आली.

तपास पथकातील पोलीस हवालदार कैलास रईस अहमद व रायगाव टोली नाका येथील अंमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारे मध्य प्रदेश राज्यातील राजगड टोलनाका येथे सापळा रचला. या सापळ्यात चोरीस गेलेले वाहन आणि चोरी करणारे आरोपी मोहम्मद कैफ रईस अहमद (वय २४, रा. गाव पल्ला, नहू, मेवात, हरियाणा) व नहू (मेवात, हरियाणा) येथील त्याचा साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले.

धुळे शहर पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास करून २४ तासांच्या आत चोरी गेलेले वाहन हस्तगत केले असून, आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुभाष मोरे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments