Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पहलगाम आतंकवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना गोळ्या घातल्या

 जगाला सुन्न करणारी घटना


जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील पहलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 पर्यटकांना निर्घृणपणे त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. हे चारही दहशतवादी भारतीय सैन्याच्या वेशात घटनास्थळी आल्याने कोणालाही त्यांच्यावर संशय आला नाही. 26 जणांची हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी या ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर मात्र भारतीय सैन्य दलातील जवान या ठिकाणी दाखल झाल्यावर पर्यटकांना दहशतवादी पुन्हा आल्याची भीती वाटली. यावेळी आम्हाला सोडून द्या म्हणत पर्यटकांनी एकच गोंधळ घातला, जिवाची भीक मागितली.. 


पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, तर रायगडमधील दिलीप देसले, ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा समावेश आहे. पहलगाममधील बैसरन घाटी येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी नाव विचारून आणि धार्मिक ओळख परेड करून फक्त पुरूष पर्यटकांवरच गोळ्या झाडल्या. यात २६ जणांचा मृत्यू झाला. जगभरातील तमाम नागरीक या भ्याड हल्ल्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments