सहसंपादक अनिल बोराडे
भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक या पदावर लक्ष्मीकांत सिद्धार्थ बेडसे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत काम करीत आहे. आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील काही दिवसांपासून सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. लक्ष्मीकांत सिद्धार्थ बेडसे जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा बाळगत समिती अध्यक्ष यांना लक्ष्मीकांत बेडसे यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्यात......
Post a Comment
0 Comments