Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

एन. एम. एम. एस. परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन व सत्कार


 सहसंपादक अनिल बोराडे 

न्यू इंग्लिश स्कूल बल्हाणे विद्यालयात एन. एम. एम. एस. परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास पिंपळनेर एज्यु. सोसा. पिंपळनेर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा.बाळासाहेब रूपचंद नारायण शिंदे तसेच उपाध्यक्ष दादासो. सुरेंद्र विनायक मराठे तसेच संचालक तात्यासो. रामचंद्र पुंडलिक भामरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एच. के. चौरे सर, ज्येष्ठ शिक्षक व्ही. ए. दहिते सर, एस. बी. राणे सर, तसेच पालक वर्ग उपस्थित होते.सदर परीक्षेसाठी एकूण 26 विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यात 23 विद्यार्थी पास झाले असून 09 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरलेत.

पवार उर्वशी माणिक,बहिरम गणेश देवेंद्र,सोनवणे ईशांत महेश,वाघ मयुरी कृष्णा,पवार दिव्यांनी अनिल,केसरोद अमित सुदाम,ठाकरे अमोल जय,पवार मोहिनी,भीमराव,पवार वृषाली विलास

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. बी. अहिरे सर यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्ताविका एम. व्ही. अहिरराव सर यांनी मांडली. संस्थेचे अध्यक्ष मा. रूपचंद नारायण शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसंबंधी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्यात व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आला. सदर परीक्षेसाठी मार्गदर्शक म्हणून डी. बी. अहिरे सर, के. आर. कोळी सर, एस. जे. नगरकर सर,एम. व्ही. अहिरराव सर,के. ए. मराठे सर,ए. पी. बच्छाव मॅडम यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी डी. एस. जैन सर यांनी उपस्थितांचे आभार मानलेत.

Post a Comment

0 Comments