सहसंपादक अनिल बोराडे
उत्तम दृष्टिकोन आणि सृष्टीतील सौंदर्य जाणायचे असेल तर निसर्गा शिवाय पर्याय नाही. सातपुडा आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगेत आपल्या निसर्ग प्रेमातून नंदनवन करणारे वनभूषण पद्मश्री चैत्राम पवार बारीपाडा ही त्यांची जन्मभूमी गेल्या २७ वर्षापासून आपल्या गावाचा विकास करत आपलं अख्ख गावचं त्यांनी नंदनवन केलं.
बारीपाडा ता.साक्री या छोट्याशा गावाची ओळख भारताच्या नकाशावर नेली. साधी राहणी पण उच्च विचारसरणी यांचा मेळ साधणारे चैत्राम पवार एम. कॉम ही पदवी घेऊन त्यांनी आपल्या गावासाठी वेगळी ओळख आपल्या शिक्षणातून करून दिली. गावाचा विकास हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला विविध उपक्रम संस्कृती जपून जंगल संवर्धनासाठी बारीपाडा गावाने कात टाकली. पारंपारिक पद्धतीने शेती करून येथील प्रत्येक शेतकरी रासायनिक खत हद्दपार करू लागला आहे. प्रदूषण नको म्हणून चैत्राम पवार यांनी गावात . दळणवळणा साठी फक्त दोन रिक्षा ठेवल्या शहरात नष्ट झालेल्या चिमण्या चैत्राम पवार यांच्या गावात आता शेकडो चिमण्या घरटं करून राहतात. येथील जमिनीला निसर्गाला आशीर्वाद आहे. कोणतेही बी टाकले तर ते तरारून उगवते.
उजाड माळरानावर जवळपास ११०० हेक्टर जंगल सांभाळून वनराई बहरवली आहे. जंगल एवढे दाट झाले आहे की सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नाही. जवळपास ४०० पेक्षा अधिक जातीचे पक्षी या नंदनवनात गुण्या गोविंदाने नांदत आहेत. इंद्रायणी जातीचा तांदूळ आता याच गावातून एक्सपोर्ट केला जातो. जंगलात अनेक वनौषधी वनस्पती असून अनेक रोगांवर व दुखण्यावर लाभदायक ठरू लागले आहेत. उतुगं काम करणाऱ्या चैत्राम पवार यांना अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. जर्मनी, कॅनडा येथील संशोधकानी तर चक्क बारीपाडा या चैत्राम पवारांच्या गावावर पीएचडी केली आहे. जल, जमीन, जंगल, जन, व जनावर या पाच मुद्यावर चैत्राम पवार अभ्यास करीत आहेत. जैवविविधता जपणे जंगल संस्कृतीची राखण करून त्यांनी वनराईचा एक आदर्श निर्माण केला आहे. आपुलकी आणि आदरतिथ्याची भावना जपासणारे पवार यांनी आपलं गाव तीर्थक्षेत्र बनवले आहे हे मात्र तितकेच खरे.
Post a Comment
0 Comments