सहसंपादक अनिल बोराडे
कै.पुखराजजी चिमणीरामजी टाटीया यांच्या ४३ व्या पुण्यस्मरणार्थ भव्य आरोग्य तपासणी शिबिर व धुळे येथील मातोश्री वृद्धाश्रम व कुष्ठरोग आश्रमातील नागरीकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
पुजक हाॅस्पीटल रामनगर पिंपळनेर येथे कै.पुखराजजी चिमणीरामजी टाटीया यांच्या ४३व्या पुण्यस्मरणार्थ भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रथम कै.पुखराजजी टाटीया यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.बी.पी.टाटीया, डॉ.के.पी.टाटीया, सौ.लताबाई टाटीया, इंदरचंद टाटीया, डॉ.कल्पेश टाटीया,व सौ.भाग्यश्री टाटीया, ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी केले व पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी पिंपळनेर व परिसरातील ११५ रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. या शिबीरात इ.सी.जी.(हृदयाची तपासणी),सी.बी.सी.(रक्त प्रमाण पेशी) युरीक ऍसिड (अमवात),आर.बी.एस.एल.(साखरेची तपासणी), करण्यात आली व योग्य औषधोपचार करण्यात आले.तसेच धुळे येथील मातोश्री वृद्धाश्रम व बंडोपंत पाठक यांच्या कुष्ठरोग आश्रमातील नागरीकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
सदर शिबिर डॉ.टाटीया यांचे पुजक हॉस्पिटल पिंपळनेर व ॲलिम्बिक फार्मासिटीकल आणि मॅनकाइंड निऑन फार्मास्युटिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते.
शिबिर यशस्वीतेसाठी सुमीत जाधव, हम्माद अख्तर, प्रांजल जाधव, चेतन पगारे, सुर्यकांत सोनवणे, हिमांशू घुगे, ब्रिजलाल टाटीया,आदीत्य टाटीया, हरीष जगताप, सौ.भाग्यश्री कल्पेश टाटीया यांनी परीश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments