सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर अनिस तर्फे महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी धुळे जिल्हा अनिस चे उपाध्यक्ष सुरेंद्र दादा मराठे,पिंपळनेर अनिस चे अध्यक्ष आप्पासाहेब व्ही एन जिरेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब देविदास नेरकर, रिखबचंद शेठ जैन, अनिस जिल्हा कार्यकारणीचे,बुवाबाजी संघर्ष कार्यवाह आबासाहेब सुभाष जगताप,जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा शिवप्रसाद शेवाळे, जिल्हा महिला कार्यवाह मनिषा भदाणे ,पिंपळनेर अनिस चे कार्याध्यक्ष देविदास कुवर,प्रधान सचिव, शिरीष कुवर,सामोडे अनिस शाखा देवीदास पाटील,खजिनदार ललित मराठे, उपाध्यक्ष ललिता बिरारीस, पिंपळनेर महिला कार्यवाह छाया वाडेकर, सांस्कृतिक कार्यवाह प्रा एम डी माळी ,श्रीमती रेखा पाटील,लक्ष्मण पाटील, डी डी महाले ,अनिल बोराडे,भरत बागुल , यांनी अभिवादन केले. तसेच जिल्हा कार्यकारणीत उपाध्यक्ष पदी निवड झालेले दादासाहेब सुरेंद्र मराठे व इतर जिल्हा कार्यकारणीत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच पिंपळनेर अनिस चे अध्यक्ष व्ही एन जिरेपाटील यांचा 74 वा वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले.व नुकतेच भारतीय सैन्य दलातून २१वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले मेजर ऊमेश मोरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिवप्रसाद शेवाळे यांनी केले .तर आभार सुभाष जगताप यांनी मानले
Very nice 👍
ReplyDelete