Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जेसीबी, ट्रॅक्टर सह अंदाजे पंचवीस लाखांचा मुद्देमाल वनविभागाने केला जप्त

 सहसंपादक अनिल बोराडे



दिनांक 14.03.2025 सकाळी दिघावे परिमंडळातील वनकर्मचारी गस्त करीत असताना शेलबारी फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर 221 मध्ये आरोपी श्री पोपट सुक्राम पवार  शेतकरी व श्री. कुंदन रमेश चौरे ट्रॅक्टर चालक तसेच लखन बांजी साव जेसीबी चालक हे  विना परवाना जंगल क्षेत्रात जेसीबीच्या सहाय्याने माती मिश्रित मुरूम खोदकाम करीत असताना आढळून आले. याबाबत वनरक्षक दिघावे यांनी भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 26 (1) ड , ग व 52 नुसार वनगुन्हा POR 03/2025 नोंद केला असून यानुषंगाने जेसीबी व ट्रॅक्टर ट्रॉली सह हा अंदाजे पंचविस लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करून पिंपळनेर वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आला . सदर कारवाई श्री. ओंकार ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी पिंपळनेर प्रा. यांच्या मार्गदर्शनाखाली दिघावे परिमंडळाचे वनपाल श्री.आर व्ही चौरे , परिमंडळातील वनरक्षक श्री. अनिल एम घरटे , श्री. दीपक राठोड , श्रीम. सविता ठाकरे तसेच वनमजूर बाजीराव पवार, ऊजेंद्र चौधरी, बबलू कुवर यांनी केली. पुढील तपास श्री. आर. व्हि.चौरे, वनपाल दिघावे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments