मागील आठवड्यात हवामान खात्यासह प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डंख यांनी अवकाळी पावसासह गारपीटीचा अंदाज व्यक्त केला होता.महाराष्ट्रातील विशेषतः खानदेश भागातील नंदुरबार जिल्ह्यासह धूळे जिल्ह्यातील अनेक गावांत गारपीटीचा जोरदार पाऊस पडला त्यात शेतकरी बांधवांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी बांधल हवालदिल झाला आहे.कांद्यासह, मिरची, विविध प्रकारचे धान्य, भाजीपाला शेतातच असल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.मायबाप शासनाने लवकरात लवकर पंचनामे करत नूकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी बांधव करीत आहेत. आसमानी संकट तसेच
निसर्गाच्या चक्रात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले दिसून येत आहे.साक्री तालुक्यातील नेर,पिंपळनेर, दहिवेल,बोदगांव,चिंचपाडा येथील शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा, गंगापूर या गावात सुमारे एक तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला तसेच ठाणविहीर येथील पंडित अंत्या पवार शेतातील झोपडीत राखण करत त्याचा अंगावर वादळी वाऱ्याचा पावसामुळे पत्रा पडल्याने गंभीर जखमी झाल्याने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पाळीव प्राणी, गुरे- ढोरे वादळी वाऱ्यात जखमी झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावात घरांच्या छतावरील पत्रे उडून गेले असून काही घरांची पडझड झाल्याचे समोर आले आहे.
Post a Comment
0 Comments