सहसंपादक अनिल बोराडे
साक्री तालुक्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील पिंपळनेर भागात गावठाण विद्युत सिंगल फेज करण्याचे काम आदिवासी परिसरात विद्युत महा.वितरण कंपनी सब स्टेशन बल्हाणे ता.साक्री जि.धुळे यांच्या कडुन ठेकेदारांच्या माध्यमातून शेवगे ग्रामपंचायत मधील सितारामपुर व वंजारतांडा येथे सिंगलफेज पोल व तार टाकण्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे चालु आहे.
संबंधित अधिकार्यांचा देखरेखीखाली ठेकेदार काम करीत आहेत सितारामपुर मध्ये अडचणी का येत आहेत या संदर्भात विचारणा केली असता,पोल किती अंतरावर पाहीजे.विद्युत तार एकमेकांना चिपकल्या नंतर काही विपरित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असे विचारले असता आम्ही आमच्या पध्दतीने काम करु तुम्ही आम्हांला विचारणारे कोण तुम्ही कोणाकडे पण जा ते आमदार असो किंवा खासदार , कोणाकडे जरी गेले ते आमचं काहीच वाकड करू शकत नाही.असे ठेकेदाराकडुन अरेरावी ची भाषा वापरली जात आहे अधिकारी व बिहारी ठेकेदार यांचा आदिवासी भागात मनमानी कारभार सुरू आहे.महाराष्ट्र मध्ये ठेकेदार नाहीत का .परप्रांतीय ठेकेदारांच्या कडुन गावातील व्यवसायीकांना चुकीची वागणुक दिली जात आहे.आदिवासी उपयोजनेच्या भागातील लोकांना नाहक त्रास दिला जात आहे.सुरु असलेल्या कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.अशी मागणी महा.राज्य आदिवासी बचाव अभियान धुळे जिल्हा प्रमुख गणेश गावीत,तानाजी बहिरम,साक्री तालुका अध्यक्ष,वंजी पवार यांच्या कडुन करण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments