Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सोनगीर ते दोंडाईचा व दोंडाईचा ते चिमठाणे रस्ता वाहतुक 16 एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत राहणार बंद

 सहसंपादक अनिल बोराडे 

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोनगीर दोंडाईचा टाकरखेडा रस्ता प्ररामा - 1 (भाग किमी 18/880 ते 55/650 सोनगीर ते दोंडाईचा रस्ता एकूण लांबी 36.85 किलोमीटर) या रस्त्याची सुधारणा करण्याचे काम आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यीत योजनेअंतर्गत प्रगतीत आहे. त्यामुळे सोनगीर फाटा मार्गे दोंडाईचा - शहादा- नंदुरबार जाणारी अवजड वाहने नरडाणा - शिंदखेडा दोंडाईचा या राज्यमार्गावरून तसेच दोंडाईचा मार्ग चिमठाणे सोनगीर येणारी अवजड वाहतूक दोंडाईचा - शिंदखेडा - नरडाणा मार्गे वळविण्याची मागणी केली आहे. तसेच छोटी वाहने जसे कार, जीप, ट्रॅक्टर, रिक्षा व परिवहन महामंडळ बस यांना पर्यायी रस्ताने वळविण्याची आवश्यकता नाही याबाबत नमूद केलेले आहे. 




त्यानुसार सोनगीर ते दोंडाईचा रस्तावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने जितेंद्र पापळकर, जिल्हादंडाधिकारी, धुळे यांनी सोनगीर ते दोंडाईचा रस्तावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वाहतुक वळविणेबाबत आदेश निर्गमित केले आहे.


सोनगीर फाटा मार्गे दोंडाईचा-शहादा - नंदुरबार जाणारी अवजड वाहने व दोंडाईचा मार्ग चिमठाणे- सोनगीर कडे येणारी अवजड वाहने ही दोंडाईचा - शिंदखेडा – नरडाणा या पर्यायी मार्गाचा वापर करतील. 


हा आदेश 16 एप्रिल, 2025 पासून पुढील आदेश होईपर्यंत लागू  राहतील. असे जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments